धक्कादायक: वस्तऱ्याने तरुणाचा गळा कापला; संतप्त जमावाने आरोपीलाही ठार मारले

WhatsApp Group

किनवट (जि. नांदेड) : दाढी करण्यासाठी गेलेल्या तरुणाशी भांडण झाल्यामुळे सलून चालकाने वस्तऱ्याने त्याचा गळा कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे तरुण मृत्युमुखी पडला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने सलून चालकाला बेदम मारहाण करून ठार केले आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी बोधडी बुद्रुक, ता. किनवट येथे सायंकाळी घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

बोधडी (बु.) येथील व्यंकटी सुरेश देवकर (२२) हा गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अनिल मारोती शिंदे (३२ ) याच्या सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेला असता तेथे काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातून अनिल शिंदे याने दाढी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तऱ्याने व्यंकटी देवकर याच्या गळ्यावर वार केला व तो तेथून पळून गेला. गंभीर जखमी झालेला व्यंकटी देवकर जीव वाचविण्यासाठी गळ्याला रुमाल धरत तेथून लगेच निघाला आणि ५० फूट चालत जाऊन कोसळला. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

व्यंकटी खुनामुळे तेथे जमलेले गावातील लोक संतप्त झाले. त्यांनी मारेकरी अनिल शिंदे याचा शोध घेतला. तो नाल्याच्या काठी एका झुडपामध्ये लपून बसला होता. जमावाने त्याला शोधून, तेथून मारत-मारत मार्केटमध्ये आणून बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचाही अनिलही मृत्यू झाला.

🪀INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा