कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर येथील कणेरी मठावरील गोशाळेतील सुमारे 53 गायींचा मृत्यूचा फूड पॉइसनमुळे मृत्यू झाला आहे.
शिळ अन्न खायला दिल्यामुळे गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पशु संवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. तब्बल 53 गाईंचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर अजूनही जवळपास 33 गाईची प्रकृती अत्यवस्थ असून 33 गाईंना वाचवसाठी पशुसंवर्धन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे.