धक्कादायक! राज्यात रोज 34 बाळांचा होतो गर्भातच मृत्यू

WhatsApp Group

राज्य सरकारकडून माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. माता आणि बाल माता तसंच बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून विविध स्तरावर उपाय करत असल्याचा दावा केंद्र आणि राज्य शासनाकडून वारंवार केला जातो. परंतु असं असूनही राज्यामध्ये दिवसाला सरासरी 34 बाळांचा मातेच्या गर्भातच मृत्यू होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक आठ तासात एक मातामृत्यू होत आहे. माहिती अधिकारामधून ही धक्कादायक माहिती माहितीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तपशिलातून समोर आली आहे.

राज्यात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 दरम्यान 13 हजार 635 उपजत मृत्यू तर 1 हजार 217 मातामृत्यू नोंदवण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे आणलेत. पुण्यातील राज्य कुटुंब कल्याण कार्यालय आकडेवारीला दुजोरा दिला आहे.