उद्धव ठाकरेंना धक्का, आमदार मनीषा कायंदे शिंदे गटात सामील

0
WhatsApp Group

महाराष्ट्राच्या विधान परिषद सदस्या (MLC) मनीषा कायंदे यांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचा हातमिळवणी केल्यानंतर मनीषा यांची उद्धव गटाच्या प्रवक्त्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. ठाकरे गटातील महिलांकडून पैशांची मागणी केली जाते, असा दावा मनिषा कायंदे यांनी केला. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला गेल्या दोन दिवसांतील हा दुसरा धक्का आहे. एक दिवसापूर्वीच ज्येष्ठ नेते शिशिर शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.

आमदार मनिषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटवरून शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, मनिषा कायंदे या उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाच्या आमदार यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.