LPG Gas Cylinder Price: होळीपूर्वी सर्वसामान्यांना झटका, घरगुती गॅस सिलिंडर महागला

WhatsApp Group

Lpg Cylinder Price: महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. बुधवारी सकाळी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून आता एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांचा झाला आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 1103 रुपयांवर पोहोचली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 350.50 रुपयांनी वाढली आहे. या वाढीमुळे दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2119.50 रुपये होईल. नवे दर आजपासून लागू होणार आहेत. स्थानिक करांमुळे घरगुती एलपीजीच्या किमती राज्यानुसार भिन्न असतात. इंधन किरकोळ विक्रेते दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये बदल करतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यापूर्वी, ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या दिवशी LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला होता. त्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली होती. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सिलिंडरचे दर वाढवल्यानंतर रेस्टॉरंट, हॉटेल्स आदी खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. त्याचबरोबर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही बदल झाल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवरही परिणाम होणार आहे.

गेल्या वर्षी गॅस सिलिंडरचे दर चार वेळा वाढले होते
ओएमसीने गेल्या वर्षी 6 जुलै रोजी घरगुती सिलिंडरच्या किमती वाढवल्या होत्या. सिलिंडरच्या दरात 153.5 रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी चार वेळा दरात वाढ करण्यात आली होती. OMC ने मार्च 2022 मध्ये प्रथम 50 रुपयांनी, पुन्हा 50 रुपयांनी आणि मे मध्ये 3.50 रुपयांनी वाढ केली. यानंतर जुलैमध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.