भारताच्या जावयाचा शारजाहमध्ये धुमाकुळ, ठोकलं 18 चेंडूत अर्धशतक!

WhatsApp Group

शारजाह – आयसीसी T20 विश्वचषक 2021 च्या 41 व्या सामन्यात आज स्कॉटलंडचा सामना पाकिस्तानशी होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 189 धावा केल्या. पाकसाठी दिग्गज खेळाडू शोएब मलिकने वादळी खेळी करत अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. मलिकने आपल्या या धमाकेदार खेळीत 6 षटकार आणि 1 चौकार ठोकला. मलिकने आपल्या डावात 18 चेंडूत नाबाद 54 धावांची खेळी केली.

टी-20 विश्वचषकात पाकिस्तानसाठी सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रमही शोएब मलिकने आपल्या नावावर केला आहे. पाकिस्तानच्या डावाच्या अखेरच्या षटकात शोएब मलिकने तब्बल 26 धावा केल्या, या षटकात त्याने 3 षटकार आणि एक चौकार लगावला.


पाकिस्तानचा संघ या पूर्वीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे, शोएब मलिकच्या या वादळी खेळीमुळे पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडविरुद्ध 189 धावांची मोठी धावसंख्या उभारली. पाकिस्तानसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघही उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.

जर पाकिस्तानचा संघ हा सामना जिंकला तर सुपर 12 फेरीतील सर्व सामने जिंकणारा तो एकमेव संघ बनेल. पाकने आतापर्यंतचे चारही सामने जिंकले आहेत. आज त्याचा पाचवा आणि शेवटचा सामना सुरू आहे. स्कॉटलंडने सुपर-12 मध्ये एकही सामना जिंकलेला नाही.