Shoaib Akhtar: तिसऱ्यांदा बाप बनला शोएब अख्तर, शेअर केले बाळाचे PHOTOS

WhatsApp Group

Shoaib Akhtar: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर शुक्रवारी तिसऱ्यांदा बाबा झाला. त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. शोएबला आधीच दोन मुले मोहम्मद मिकाइल अली आणि मोहम्मद मुजद्दाद अली आहेत. आता त्याला एक सुंदर मुलगी झाली आहे.

रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने आपल्या मुलीचे नाव नूरह अली ठेवले आहे. शोएबच्या पत्नीचे नाव रुबाब खान आहे आणि जी त्याच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान आहे. शोएब अख्तरने त्याच्या इंस्टाग्रामवर ही माहिती शेअर करताच नेटकऱ्यांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Akhtar (@imshoaibakhtar)

शुक्रवारी शोएबने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तो मुलीला मांडीवर घेतलेला दिसत आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले, मिकाईल आणि मुजद्दीद यांना आता एक लहान बहीण आहे. अल्लाहने आम्हाला मुलगी दिली आहे. 1 मार्च 2024, 19 शाबान, 1445 हिजरी रोजी जुम्माच्या नमाजच्या वेळी जन्मलेल्या नूरह अली अख्तरचे स्वागत.