मोठी बातमी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

WhatsApp Group

पुणे – ‘शिवशाहीर’ हा शब्द ऐकू आल्यानंतर आपल्या समोर ज्यांच चित्र उभ राहतं त्या बाबासाहेब पुरंदरेंच वयाच्या 100 व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे. गेल्या 3 दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक होती. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यभर शोककळा पसरली आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला.


बाबासाहेब पुरंदरे यांच मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. त्यांचा जन्म पुण्याजवळच्या सासवडमध्ये २९ जुलै १९२२ रोजी झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली होती. 2015 सालापर्यंत बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 12 हजारपेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत.

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा बाबासाहेब पुरंदरेंनी सखोल अभ्यास केला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणेने असंख्य शिवभक्त आणि गडप्रेमी निर्माण झाले.