विदर्भात शिवसेना वाढवायची असेल तर नागपूरमध्ये घट्ट पाय रोवले पाहिजेत – संजय राऊत

WhatsApp Group

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेचं(Shivsena) विदर्भामधील (Vidarbha) पक्ष संघटन विस्तार आणि एसटी संप यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. नागपूर महापालिकेच्या दृष्टीने पक्षाची बांधणी सुरु आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. विदर्भात जर पक्ष वाढवायचा असेल जर शिवसेना वाढवायची असेल तर नागपूरमध्ये घट्ट पाय रोवले पाहिजेत. उपराजधानी आहे, हिंदुत्त्वाचा गड आहे, एकेकाळी शिवसेनेची ताकद होती, आणि आताही आहे. नागपूरमध्ये आदित्य ठाकरे शासकीय कामासाठी जाणार आहेत, ते पक्षासंदर्भात भूमिका घेतील, असं संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्ष केंद्रीत करत आहे. विदर्भामध्ये आम्ही लक्ष घालायला सुरुवात केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ताकदीने प्रतिनिधीत्त्व मिळवायचे असेल तर ६५ जागा असलेल्या विदर्भामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षकार्यासाठी लवकरच कामाला लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीचा विषय होता, कोरोनाचे संकट होते, मात्र आता आम्ही संघटनात्मक कामासाठी तयार आहोत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

विदर्भ हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा भाग आहे. तिथून ६५ आमदार निवडून येतात. आमचे खासदार आणि आमदार विदर्भामध्ये आहेत. विदर्भ हिंदुत्त्वाचा गड राहिला आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या – 
५८ कोटी रुपयांची बनावट उलाढाल दाखवून कर चुकविल्याप्रकरणी एकास अटक
IPL 2022: चेन्नईसोबत हरल्यास मुंबई आयपीएलमधून होणार बाहेर!
नवी मुंबईत उभारले जाणार व्यंकटेश्वर मंदिर