मुंबई – मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आज (ता. १७ एप्रिल) आत्महत्या केली आहे. रजनी कुडाळकर (वय ४२) असं त्यांच्या पत्नीच नाव आहे. मंगेश कुडाळकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. ही घटना कुडाळकर यांच्या राहत्या घरामध्ये घडली आहे.
या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. नेहरू नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या बातमीचा दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
The body of Shiv Sena MLA Mangesh Kudalkar’s wife Rajani was found hanging at her residence. Senior police officials present at the spot: Mumbai Police
— ANI (@ANI) April 17, 2022
रजनी कुडाळकर यांनी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी रजनी यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयामध्ये ‘पोस्टमॉर्टम’साठी पाठवला आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.