योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं; फडणवीस सोडणार आहेत का?, दीपाली सय्यद यांचं वादग्रस्त वक्तव्य 

WhatsApp Group

मुंबई – अनेक मुद्यांवरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना दीपाली सय्यद यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी टीका केली आहे.

“ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से !” अशा शब्दात ट्वीट करत अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. याच मुद्द्यावरून दीपाली सय्यद यांनी ही टीका केली. त्या म्हणाल्या की, ‘योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार आहेत का?’ अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, याआधीही भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. ‘किरीट सोमय्यांच्या जागी मोदी जरी असते तरी गाडी फुटली असती’ अशा शब्दात त्यांनी टीका केली होती.