
मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी समर्थन केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी शिवसैनिकांना बाळासाहेबांची शिकवण आहे, त्यामुळे तिथे मोदींची गाडी असती तर तीदेखील फोडली गेली असती असं विधान त्यांनी केलं आहे. रायगड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद यांनी राणा दांपत्यावरही निशाणा साधला आहे.
राजद्रोहाच्या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालय दंड लावून सोडणार असेल तर शिवसैनिकांनी फेकलेल्या चपलांचा हिशेबसुद्धा बंटी बबलीकडून घ्यावा असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. जो नडला त्याला फोडला ही त्यांची शिकवण आहे. त्या ठिकाणी जर मोदींची गाडी असती तर तीदेखील फोडली गेली असती, असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
दीपाली सय्यद पुढे म्हणाल्या की, “राणा दांपत्य मोदींची माकडं आहेत. अचानाक येतात आणि बोलतात. त्यांचे वक्तव्यं चुकीचं होतं. मातोश्रीमध्ये घुसून पठण करणार असं वक्तव्य करणं चुकीचं होतं. तुम्हाला करण्यासाठी मनाई नव्हती. तुम्ही प्रेमाने आला असता मंदिरं आहे तिथे केलं असतं पण तुम्हाला मातोश्रीमध्ये घुसूनच करायचं होतं का? हे काहीतरी विचित्र सुरु असल्याचे दिसत आहे”. असं दीपाली सय्यद यावेळी बोलताना म्हणाल्या.