
मुंबई – राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना यांच्यात मुंबईमध्ये हायव्होल्टेज ड्रामा रंगलेला असतानाच शिवसैनिकांनी भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. रात्री सव्वा ९ वाजताच्या सुमारास शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
मुंबई: महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के निवास स्थान, मातोश्री के पास बीजेपी नेता मोहित कंबोज की गाड़ी पर हमला। शिवसैनिकों पर हमले का आरोप @news24tvchannel#mohitkamboj pic.twitter.com/o4ta0XH8dG
— Indrajeet Singh (@iamindrajeet74) April 22, 2022
मातोश्री परिसरामधून मोहित कंबोज यांची गाडी जात होती. सिग्ननलला त्यांची गाडी थांबली होती. ५ मिनिटांपासून कुणाची तरी गाडी थांबली आहे, असा शिवसेना कार्यकर्त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी गाडीची पाहणी केली. त्यात त्यांना मोहित कंबोज दिसले. त्याक्षणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. यावेळी कंबोज यांचे सुरक्षारक्षक आणि तिथे असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला.
मोहित कंबोज हे शिवसैनिकांना डिवचण्यासाठी तिथे आले होते तसेच मातोश्री परिसराची ते रेकी करत होते, त्यावेळी हा हल्ला झाल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.