छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सुंदर घटना…आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने तुम्ही सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Shivrajyabhishek Din Wishes in Marathi
स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट
रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट
डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं..!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
मराठा राजा माझा
म्हणती सारे माझा माझा
आजही गौरव गीते गाती
ओवाळुनी पंचारती
तो फक्त राजा शिवछत्रपती!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले
रायगडाचे माथे फुलांनी सजले… पाहुन सोहळा
‘छत्रपती’ पदाचा 33 कोटी देवही लाजले…
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!