
शिवप्रेमींना जून महिना लागला की आस लागते ती रायगडाची, 6 जून रोजी रायगडावर होणाऱ्या त्या भव्यदिव्य दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळ्याची! या वर्षी देखील कोरोना महामारीच्या संकटामुळे शिवराज्याभिषेक दिन देखील आपल्याला घराघरात साजरा करावा लागतो आहे. त्यानिमित्ताने आपण एकमेकांना शिवराज्याभिषेक दिन निमित्त शुभेच्छा संदेश पाठवून समोरच्याचे देखील मनोबल वाढवू शकतो.
शिवराज्याभिषेक दिन शुभेच्छा
- होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा! शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
- झनझविला भगव्याच्या समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती तुम्ही… ! शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा…!
- मराठा राजा माझा म्हणती सारे माझा माझा आजही गौरव गीते गाती ओवाळुनी पंचारती तो फक्त राजा शिवछत्रपती! शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
- इतिहासालाही धडकी भरेल असं धाडस या मातीत घडलं दगड धोंड्यांच्या स्वराज्यात सुवर्ण सिंहासन सजलं! शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!!!
- सिंहासनी होतो आरूढ गर्व मराठ्यांचा मुजरा तुजला आमचा हे प्रभो शिवाजी राजा शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
- एक होऊनी करू उत्सव शिवराज्याभिषेक दिनाचा एक विचाराने चालवू वारसा अवघ्या महाराष्ट्राचा शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!