शिवराज राक्षे ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडला केलं पराभूत

WhatsApp Group

गेल्या 4 दिवसांपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील भल्या भल्या पैलवानांचा पराभव करत महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे अंतिम लढतीसाठी एकमेकांपुढे उभे ठाकले होते. कोण होणार नवा महाराष्ट्र केसरी? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शनिवारी सायंकाळी लाखो कुस्ती शौकिनांना याचं उत्तरं मिळालं आहे. शिवराज राक्षेने अवघ्या काही सेकंदात महेंद्र गायकवाडचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे.

महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पाहण्यासाठी पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. तसेच या अंतिम सामन्याला राज्यातील दिग्ग्ज नेत्यांनी देखील उपस्थिती लावली होती.