मळईवाडीतील ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण, शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा उद्घाटन सोहळा १ मे रोजी

WhatsApp Group

शिरशिंगे: मळईवाडी गावासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक असा क्षण उगम पावत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) शिरशिंगे मळईवाडी येथे उभारण्यात आला असून, या पुतळ्याच्या अनावरणाचा उद्घाटन सोहळा १ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या प्रसंगी सर्व नागरिक, ज्येष्ठ मंडळी तसेच युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक आणि भारतीय इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मळईवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन, अनेक महिन्यांच्या प्रयत्नांती या पुतळ्याचं काम पूर्ण झालं आहे.

मळईवाडी ग्रामस्थांसाठी हा केवळ एक कार्यक्रम नसून, गावाच्या ऐक्याचे आणि सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक ठरणारा सोहळा आहे. त्यामुळं या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं.