
राहुल गांधी यांच्या गुरुवारी केलेल्या सावरकर यांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेला वाद आणखी अनेक वादांना तोंड देत आहे. राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारला लिहिलेले पत्र दाखवून सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंचं तापलं आहे. भाजप, शिंदे गट आणि मनसेने त्यांच्या या विधानाचा निषेध केला. राहुल यांनी शुक्रवार आणि शनिवारी सावरकरांवर बोलणे टाळले. दरम्यान आता भाजप नेते सुधांशू त्रिवेदी छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती हे विधान चर्चेत आलं आहे.
सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबला पत्र लिहून 5 वेळा माफी मागितली”, असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सुधांशू त्रिवेदी यांचं हे जुनं विधान आहे. आजतक या वृत्तवाहिनीच्या डिबेट शोमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलं होतं. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होतं आहे.
शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबा ची पत्र लिहून माफी मागितली होती असा म्हणणारा ठार वेडाच असू शकतो … बोलणारा #भाजप प्रवक्ता pic.twitter.com/QzkPtsVdrK
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2022
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही त्रिवेदी यांच्या विधानावर ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती असा बोलणारा भाजप प्रवक्ता ठार वेडाच असू शकतो, असं ते म्हणाले आहेत.