शिमल्यात मुसळधार पावसामुळे शिवमंदिर कोसळलं, 50 भाविक गाडल्याची भीती

WhatsApp Group

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे भूस्खलनात एक मंदिर कोसळले. त्यात अनेक लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. सावन सोमवार असल्याने अनेकांनी मंदिर गाठले होते. शिमल्याच्या लाल कोठीमध्ये भूस्खलनामुळे काही लोक गाडले गेल्याची शक्यता आहे.

शिमलाचे एसपी संजीव कुमार गांधी यांनी सांगितले की, भूस्खलनात एक मंदिर कोसळले. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे. अनेक लोक अडकून पडले आहेत. बचावकार्य सुरू आहे. सावन सोमवार असल्याने अनेकांनी सकाळपासूनच मंदिर गाठले होते.