Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा; उद्धव ठाकरे यांची घोषणा

WhatsApp Group

Presidential Election 2022: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने (Shiv Sena) भाजप प्रणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही घोषणा केली आहे. हा पाठिंबा आम्ही दबावातून नाही तर उत्स्फूर्तपणे दिला आहे. राज्यातील एकूण राजकीय स्थिती ती पाहता भाजप (BJP) उमेदवार म्हणून त्यांना आम्ही विरोध करायला हवा होता. परंतू, आम्ही तेवढ्या कोत्या मनाचे नाही आहोत.

देशातील अदिवासी महिला प्रथमच इतक्या सर्वोच्च पदावर पोहोचते आहे. त्यामुळे शिवसेनेतील आदिवासी नेत्यांच्या मागणीचा सन्मान करत आम्ही हा निर्णय घेतला आहे.या आधीही शिवसेनेने पक्ष, आघाडी आणि इतर धोरणांपलीकडे जाऊन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भूमिका बजावली आहे. आम्ही प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता, अशी आठवणही उद्धव ठाकरे यांनी यावेळी करून दिली. आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.