शिवसेनेकडून संजय राऊत पुन्हा राज्यसभेवर जाणार, चौथ्यांदा बनणार राज्यसभा खासदार

WhatsApp Group

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यामध्ये रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एकीकडे संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून मैदानामध्ये उतरले आहे तर दुसरीकडे, शिवसेनेकडून संजय राऊत आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची तारीख ठरली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग चौथ्यांदा जाण्याचा नवा विक्रम संजय राऊत प्रस्थापित करणार आहेत.

संजय राऊत येत्या 26 मे रोजी विधानभवनामध्ये जाऊन राज्य सभेसाठी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहे. शिवसेना नेते म्हणून सलग चौथ्यांदा संजय राऊत राज्यसभेवर जाणार आहे. याआधी नजमा हेपतुल्ला महाराष्ट्रातून सलग 4 वेळा ( एकूण 6 टर्म ) राज्यसभेवर (1980-2018) निवडून गेल्या आहेत. तर, काँग्रेसकडून सरोज खापर्डे पाच वेळा राज्यसभेवर (72-2000) निवडून गेले आहेत. संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती.

मैदानी सभांमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भाजपवर बरसत आहेत तर राज्यसभेतून संजय राऊत मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून प्रहार करत आहेत. राज्यसभेतील शिवसेनेचा चेहरा म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे.

लोकसभा 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची एकजूट, विरोधी पक्षांच्या गटातले शिवसेनेचे स्थान तसेच भूमिका मांडण्याची जबाबदारी राऊतांच्या खांद्यावर असेल. त्याचमुळे राऊतांचं राज्यसभेत असणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे पक्ष कोणताही विचार न करता संजय राऊतांना राज्यसभेवर पाठवून त्यांचा राज्यसभेचा विजयी चौकार लागणार हे निश्चित. तसेच संख्याबळानुसार राज्यसभेवर जाण्यासाठी राऊतांना कोणताही धोका नसल्याने राऊतांच्या नावासमोर पुन्हा राज्यसभा खासदार लागणार, हे देखील निश्चित..!