शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील

WhatsApp Group

मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्या दहिसर भागातील बीएमसीच्या नगरसेविका होत्या. त्यांनी एएनआयला याबाबतची पुष्टी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर बंडखोर आमदारांविरोधात शीतल म्हात्रे यांनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर आठ दिवसातच शीतल म्हात्रे या शिंदे गटात सामील झाल्या आहेत. शिवसेनेच्या मुंबईतील एक आक्रमक नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. 2012 आणि 2017 ला सलग दोन वेळा मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे.