पक्षास शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव द्यावे, उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

WhatsApp Group

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. यासोबतच या दोन्ही गटांना निवडणुकीमध्ये आता शिवसेना हे नाव वापरता येणार नाही, असा निर्णय ही निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. तरी शिवसेना हेच नाव वापरतां येईल परंतु त्याला काही नाव जोडावे लागेल म्हणजेचं शिवसेना नावासोबत कोनथी नाव जोडावे लागेल असे निवडणुक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान आता उध्दव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाकडे पक्षास शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव देण्याची मागणी केली आहे.