शिवसेनेचे बंडखोर आमदार 11 दिवसांनी मुंबईत दाखल

WhatsApp Group

मुंबई – उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपद निवड आणि सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईमध्ये दाखल झाले आहे. या आमदारांना आणण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड हे विमानतळावर उपस्थित होते. सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी तदडा बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई विमानतळ ते ओबेरॉय हॉटेल या मार्गिकेवर मुंबई पोलिसांनी विशेष कॉरिडॉर तयार केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.