
मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. तिच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदविण्यात आली आहे. याच पोस्टबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी खरमरीत शब्दांत टीका केली आहे.
अशा लोकांकडे दुर्लक्ष करा. हे नशेबाज लोक आहेत सगळे. यांना वेगळ्या प्रकारची नशा कोणीतरी चढवलेली आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले आहे. ते मुंबईमध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
“काही व्यक्ती हिमालयाएवढ्या असतात. काही व्यक्ती सूर्याच्या तेजासारख्या तळपत असतात. सूर्यावर कुणी थुंकलं किवा हिमालयाला कोणी तोंड वेंगाळून दाखवलं तर हिमालय आणि सूर्याचं महत्व काही कमी होत नाही. हे नशेबाज लोक आहेत यांना वेगळ्या प्रकारची नशा कोणीतरी चढवलेली आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केळे पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आणि देशात असे शूद्र किटक वावरत असतात. खिडकी उघडली आणि हवा आली की ते हवेबरोबर उडून जातील”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.