यवतमाळ – शिवसेनेच नेते आणि यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील डीवरे sunil divre याची यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेल्या शिवसेनेच्या सुनील डीवरे यांची गोळी झाडून हत्या केल्यामुळे यवतमाळसह पूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
या धक्कादायक घटनेनंतर यवतमाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुनील डीवरे यांना शासकीय रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वी ते मरण पावले होते.
सुनील डीवरे यांच्यावर देशी कट्ट्यातून गोळीबार करून कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याचे समोर आले आहे. या हल्यामध्ये दोन ते तीन जणांचा समावेश होता असेही समोर आले आहे.
पूर्ण जिल्ह्यात ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि अनेक नातेवाईकांसह शिवसैनीकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.
सुनील डीवरे यांनी आपल्या गावचे सरपंचपदही भूषवलं आहे. सध्या ते यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. तर त्यांची पत्नी ही सध्याची सरपंच आहे.