शिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर बलात्काराचा गुन्हा दाखल, धमकी देत गर्भपात केल्याचा आरोप!

WhatsApp Group

पुणे – शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक Shiv Sena leader Raghunath Kuchik यांच्यावर पुण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून 24 वर्षीय तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यामुळे आणि ती तरुणी गरोदर झाल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचाही गंभीर आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर त्या तरुणीने केला आहे.

पीडित तरुणी ही 24 वर्षांची आहे. या तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात Shivaji Nagar Police Station Pune तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीमध्ये पीडित तरुणीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आहे. नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात आपल्यासोबत हा सर्व प्रकार घडला असल्याचे त्या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.