सेनेला महाराष्ट्राबाहेर मिळाला पहिला खासदार, दादरा नगर हवेलीत फडकला भगवा

WhatsApp Group

नवी दिल्ली – शिवसेनेने दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात आपले खाते उघडले असून येथून सेनेला महाराष्ट्राबाहेरील आपला पहिला खासदार मिळाला आहे. दादरा आणि नगर हवेलीतून सातवेळा खासदार राहिलेल्या मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या पोटनिवडणुकीत ५१ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत.

३० ऑक्टोबरला दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणूक झाली होती, या निवडणुकीत कलाबेन डेलकर या शिवसेनेकडून उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी या निवडणुकीत त्यांनी भाजपचे महेश गावित यांचा पराभव केला.

कलावती डेलकर यांच्या विजयाने शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर आपला पहिला खासदारही मिळाला आहे. शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर लोकसभा निवडणूक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट केलं असून यात ते म्हणाले की, ‘दादरा नगर हवेलीत आज भगवा फडकला. लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीमती कलाबेन डेलकर जी यांचा विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे.’


आदित्य ठाकरेसह राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही कलाबेन यांचं ट्वीट करत अभिनंदन केले आहे.