
सावंतवाडी – पक्षातील आमदारांनी केलेल्या बंडाळीमुळे सध्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, शिवसेनेचे सावंतवाडी-वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनीही बंडाचा झेंडा खांद्यावर घेत गुवाहाटीची वाट धरली होती. तिथे ते बंडखोर आमदारांचे प्रवक्ते बनले आहेत.
दरम्यान, दीपक केसरकरांचे निवासस्थान असलेल्या सावंतवाडीमध्ये शिवसैनिकांकडून त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. आज सावंतवाडीमध्ये शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि केसरकरांच्या विरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सावंतवाडीमध्ये काढलेल्या शिवसेनेच्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. या मोर्चाला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आमदार वैभव नाईक,संदेश पारकर, अरूण दुधवडकर,सतीश सावंत,अतुल रावराणे,रूपेश राऊळ,बाबूराव धुरी,मायकल डिसोझा आदिचा समावेश होता.