Shinzo Abe Passes Away: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, भाषणादरम्यान झाला होता गोळीबार

WhatsApp Group

Shinzo Abe Passes Away : जपानचे (Japan) माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन झालं आहे. शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर आज सकाळच्या दरम्यान प्राणघातक हल्ला झाला, भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, यात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

शिंजो आबे यांच्या छातीजवळ गोळी लागली होती, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला झाल्यानंतर शिंजो आबे यांना हृदयविकाराचा झटका आला.

त्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली. अचानक घडलेल्या या संपूर्ण घटनेमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता.