
Uday Samant Attack : पुण्यात शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला केला आहे. मंगळवारी सायंकाळी आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा असलेल्या ठिकाणाहून जात असताना काही लोकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला.
उदय सामंत यांची गाडी पाहताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचाही फोडल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला. या घटनेचा निषेध करताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात असे राजकारण आजपर्यंत कधी झाले नाही. ही निंदनीय घटना असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात असे राजकारण नकोय. अशा घटनांना आपण घाबरणार नसल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
Shinde faction MLA Uday Samant’s vehicle attacked in Pune, Maha CM calls it ‘act of cowardice’
Read @ANI Story | https://t.co/JsoU4ElAJm#Maharashtra #EknathShinde #udaysamant pic.twitter.com/TzSLknjojK
— ANI Digital (@ani_digital) August 2, 2022
उदय सामंत म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आणि त्यांना या घटनेची माहिती दिली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत. त्याचवेळी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा भ्याडपणा असून शांतता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.
हे भ्याड कृत्य असल्याचे शिंदे म्हणाले. दगडफेक करून पळून जाण्यात शौर्य नाही. कायदा व सुव्यवस्था राखणे ही आपली जबाबदारी आहे. कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. प्रत्येकाने शांतता राखली पाहिजे, मात्र तरीही कोणी शांतता भंग केल्यास पोलिस स्वतः कारवाई करतील. राज्यात सर्वांनी जातीय व सामाजिक सलोखा राखला पाहिजे. जर कोणी असे करत नसेल तर पोलिस त्याच्यावर कारवाई करतील.