शिंदे गटाने जिंकल्या 15 पैकी 15 जागा, कोकणात ठाकरे गटाला दणका

WhatsApp Group

Konkan Politics: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी खरेदी, विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाकडून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. 15-0 ने बाजी मारत या पॅनलचे प्रमुख महेश सारंग यांनी केलेला दावा आता सत्यात उतरवला आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे . भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने पहिल्याच निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव केल्यामुळे भाजप शिंदे गटात आनंद पसरला आहे.