
शिंदे गटातील औरंगाबादचे आमदार संजय सिरसाट यांना हृदय विकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना अति रक्तदाब त्रास सुद्धा झाला आहे. त्यामुळे त्यांना रात्रीच शहरातील सिग्मा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.. त्यानंतर आता अधिक उपचारासाठी एअर अम्ब्युलन्सने मुंबईला रवाना झाले आहे. यावेळी औरंगाबाद विमानतळावर संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. हेही वाचा – Vadodara Bus Accident: वडोदरा येथे महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला बसची धडक, 4 ठार, 19 जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची तब्बेत बिघडली होती. काल दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखीच ढासळली. सध्या संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर असल्याच सांगण्यात येतं आहे. हेही वाचा – विश्वचषकानंतर ‘हे’ 3 भारतीय दिग्गज T20 फॉरमॅट खेळणार नाहीत! पहा यादीत कोणा-कोणाचा आहे समावेश?
शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते एक रिक्षा व्यावसायिक होते. 1985 साली त्यांनी शिवसेनेमधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. 2000 साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. हेही वाचा – Urfi Javed: उर्फी जावेद थोडक्यात बचावली, पहा व्हिडिओ