शिंदे गटाच्या आमदाराच्या कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

WhatsApp Group

रामटेक विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात नागपूर पासून 21 किलोमीटर दूर अंतरावर असलेला कन्हान परिसरात झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

आमदार जयस्वाल सुखरुप असून त्यांच्या पीएसह दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात झालेल्या गाडीमध्ये ते उपस्थित नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच जखमींना रुग्णालयात दाखल केले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.