नगरमध्ये शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

WhatsApp Group

अहमदनगर शहरामध्ये भाजपचे नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाने शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या केडगामधील हॉटेलची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका लग्न समारंभामध्ये या दोन्ही नेत्यांच्या मुलांमध्ये वाद झाला होता.

या वाद विकोपाला गेल्यामुळे मंगळवारी रात्री भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सातपुते यांच्या केडगामधील हॉटेलची तोडफोड करण्यात आली. या दगडफेकीमुळे अहमदनगर-पुणे महामार्गावर बराच वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. कर्डीले समर्थकांनी सातपुते यांच्या रंगोली हॉटेलवर दगडफेक केल्यानंतर सातपुतेंच्या समर्थकांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देत दगडफेक केली. कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अक्षय कर्डीले यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.