आज सकाळी 11 वाजता राज्यातील जनतेने एकत्र National Anthem गाण्याचे शिंदे सरकारचे आवाहन

WhatsApp Group

मुंबई : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या उत्सवाचा (75th Independence Day) एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यातील जनतेला बुधवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रगीत (National anthem) गाण्याचे आवाहन केले आहे. राज्यभरात सकाळी 11 ते 11:01 या वेळेत गायन पूर्ण करावे, असे त्यात म्हटले आहे.

सर्व राज्य सरकारी विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी सहभाग अनिवार्य आहे, तर नागरिकांनीही गायनात भाग घेणे अपेक्षित आहे, असे गेल्या आठवड्यात जारी केलेल्या सरकारी आदेशात म्हटले आहे. हा केंद्र सरकारच्या (Central government) स्वराज महोत्सवाचा भाग आहे, असे आदेशात म्हटले आहे.