मोठी बातमी! औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव नामांतर; शिंदे सरकारचा निर्णय

WhatsApp Group

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावर आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये  निर्णय झाला आहे. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव होणार आहे. याचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर करून घेतला जाईल आणि नंतर केंद्र सरकार कडे तो पाठवला जाईल असे म्हणाले आहेत.

यासोबतच नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं जाणार आहे. हे तिन्ही निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अखेरच्या मंत्रिमंडळामध्ये झाले होते पण ती बहुमताच्या सरकारची राज्य मंत्रिमंडळ बैठक नसल्यामुळे तो अवैध असल्याचं सांगत आज पुन्हा नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.