
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने माजी उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय बदलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे सरकारने मुंबईतील मालाड परिसरातील एका उद्यानातून टिपू सुलतानचे नाव हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोढा यांनी यासंदर्भात एक ट्विट करून लिहिले की, अखेर आंदोलन यशस्वी… गेल्यावर्षी मविआ सरकार विरोधात सकल हिंदू समाजाने केलेले आंदोलन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खा गोपाल शेट्टीजी यांची मागणी लक्षात घेऊन, मविआ सरकारच्या काळात मालाड मधील उद्यानाला दिलेले टिपू सुलतानचे नाव, जिल्हाधिकारी कार्यालयास आदेश देऊन आम्ही हटवले!
अखेर आंदोलन यशस्वी…
गेल्यावर्षी मविआ सरकार विरोधात सकल हिंदू समाजाने केलेले आंदोलन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खा @iGopalShetty जी यांची मागणी लक्षात घेऊन,
मविआ सरकारच्या काळात मालाड मधील उद्यानाला दिलेले टिपू सुलतानचे नाव, जिल्हाधिकारी कार्यालयास आदेश देऊन आम्ही हटवले! pic.twitter.com/odomiJrrrA
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) January 27, 2023
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश भरत तापसे म्हणाले की, ठिकाणांची नावे बदलून किंवा इतरांचे निर्णय बदलून कोणतेही सरकार लोकप्रिय होऊ शकत नाही. ते म्हणाले की, शासनाने अद्याप उद्यानाचे नवीन नाव जाहीर केले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टिपू सुलतान हे कर्नाटकसारख्या शेजारील राज्यात वादग्रस्त नाव असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी भाजपने उद्यानाच्या नामकरणाला विरोध केला होता.