
मुंबई – मागील वर्षी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासामध्ये आता ईडीची (ED) एन्ट्री झाली आहे. या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगची (Money laundering) चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे.
ईडीकडून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत.
पॉर्न फिल्मची निर्मिती करुन, त्या मोबाईल अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) गेल्यावर्षी राज कुंद्राला अटक केले होते.
यामध्ये कोट्यवधींचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली होती. या व्यवहारांचा आता ईडीकडून तपास केला जाणार आहे.