अहमदाबाद – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
A huge blow for Team India ahead the ODI series against West Indies. The first ODI is scheduled take place on 6th February. #INDvWI pic.twitter.com/P0VGPAxkMs
— 100MB (@100MasterBlastr) February 2, 2022
प्रेक्षकांशिवाय खेळवली जाणार एकदिवसीय मालिका
भारतीय संघाला ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्धची ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. अहमदाबादमध्ये तीनही एकदिवसीय सामने खेळले जाण्यापूर्वी टीम इंडिया येथे पोहोचली आहे आणि क्वारंटाईनमध्ये आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सर्व एकदिवसीय सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडिया
टी-20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.
एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.