Shikhar Dhawan Retirement : भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवन याची आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

WhatsApp Group

Shikhar Dhawan Retirement : गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवननं मोठा निर्णय घेतला आहे. त्यानं क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं आहे. त्यानं नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या व्हिडीओत त्याने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.

टीम इंडियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या शिखर धवनला जेव्हा टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला तेव्हा त्याच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. टीम इंडियाचा गब्बर म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन लवकरच संघात पुनरागमन करेल अशी चाहत्यांना आशा होती, मात्र आता खुद्द शिखर धवननेच निवृत्तीचा निर्णय घेऊन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. . शिखर धवनने टीम इंडियासाठी शेवटचा सामना डिसेंबर-2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

निवृत्तीचा व्हिडिओ पोस्ट करत शिखरनं लिहिलं की, “मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय संपवत आहे, मी माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि कृतज्ञता घेऊन जात आहे. प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद! जय हिंद…”

शिखर धवनची कारकीर्द 
शिखर धवनने टीम इंडियासाठी एकूण 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 2315 धावा, एकदिवसीय सामन्यात 6793 धावा आणि टी-20 सामन्यात 1759 धावा केल्या आहेत. शिखर धवनची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 190 आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 143 धावांची सर्वोच्च खेळी खेळली आहे. त्याच वेळी, टी-20 क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 92 धावा आहे.