‘रात्रीस खेळ चाले’ फेम शेवंता अडकली लग्नबंधनात

WhatsApp Group

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकानंतर एक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकताना दिसत आहेत. अक्षया देवधर-हार्दीक जोशी, आशय कुलकर्णी-सानिया गोडबोले, अभिनेता सुमीत पुसावळे आणि अभिनेता हरीश दुधाडे यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले ३’ (Ratris Khel Chale 3) फेम शेवंता म्हणजेच अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar). तिने मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत लग्न केलं आहे.