Sherlyn Chopra Shocking Confession : बॉलीवूडमध्ये येण्यासाठी लोक मुंबईत पोहोचतात पण इथे त्यांची पहिली भेट संघर्षाशी होते. आणि या काळात बरेच लोक असे मार्ग देखील निवडतात ज्यामुळे त्यांना नंतर समस्यांना सामोरे जावे लागतेच पण त्यांचा भूतकाळ देखील त्यांचा पाठलाग करत राहतो.
आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी एकेकाळी गरिबीच्या काळात पैशासाठी लोकांसोबत झोपायची, पण नंतर तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. अनेक चित्रपट केले आणि आता ती प्रसिद्ध अभिनेत्री बनलीय. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री शर्लिन चोप्राबद्दल.
खुद्द शर्लिन चोप्राने काही काळापूर्वी सोशल मीडियावर खुलासा केला होता की, एक वेळ होती जेव्हा ती पैशासाठी झोपायची, पण आता तशी परिस्थिती नाही.
शर्लिन चोप्राने ट्विट केले होते की, अनेकवेळा माझ्याशी सशुल्क शारीरिक संबंधासाठी संपर्क साधला गेला आणि मी ते पैशासाठीही केले. मी गरीब किंवा वाईट किंवा चांगली मुलगी असल्याच्या नावाखाली हे विधान करत नाहीये, हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जे लोक अजूनही मला मेसेज करतात आणि माझ्याशी संबंध ठेवू इच्छितात त्यांनी हे समजून घ्यावे की आता मी तशी नाही.
काही लोकांनी शर्लिन चोप्राला सोशल मीडियावर मेसेज केले होते, त्यानंतर अभिनेत्रीने सार्वजनिकरित्या हे वक्तव्य केले होते.
शर्लिन चोप्रा बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टचा भाग नाही पण ती सोशल मीडियावर सक्रिय असते. पापाराझीसोबतचे तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. नुकतेच तिने एक फोटोशूटही केले आहे.