
बिग बॉस 16 मध्ये साजिद खानची एन्ट्री झाल्यापासून बराच गदारोळ झाला आहे. साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या शर्लिन चोप्रा आता राखी सावंतवर भडकली आहे. शर्लिनने साजिदवर केलेल्या आरोपांविरोधात राखी सावंत साजिदच्या समर्थनार्थ समोर आली आहे. राखीने म्हटले होते की, शर्लिन दर सहा महिन्यांनी कोणावर तरी बलात्काराचा आरोप करते. तेव्हापासून दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.
नुकताच शर्लिन चोप्राचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने राखी सावंतवर राग काढला आहे. व्हिडीओमध्ये शर्लिन म्हणतेय की, राखी सावंत स्वतः लक्जरी कॉर्पोरेट प्राइवेट इव्हेंट करते आणि फक्त पैशांसाठी मुलांना बॉयफ्रेंड बनवते.
View this post on Instagram