
Pune Crime News: प्रियकराच्या (Boyfriend) प्रेमाचे गारुड मनावर पुरेपूर बिंबलेल्या एका प्रेयसीने (Girlfriend) पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्या केल्याचे पुढे आलेले प्राथमिक कारण अगदीच क्षुल्लक आहे. प्रियकर जेवण्यासाठी लवकर आला नाही म्हणून प्रेयसी असलेल्या महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. सुलोचना नामदेव लेकुरवाड असं या महिलेचे नाव आहे. ती 30 वर्षांची होती. मुळची लातूर येथील असलेली सुलोचना विवाहीत होती. सुलोचना यांच्या पतीने दोन वर्षापुर्वी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नव्हतं.
मात्र नंतर सुलोचना कामाच्या शोधात पुण्याला आली. पहिल्या पतीपासून तिला चार मुली आहेत. सर्व मुली गावी शिक्षण घेतात. सुलोचना पुण्यात आल्यावर कामधंदा शोधत होती. शेवटी तिने घरकाम आणि स्वयंपाक करुन उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला. ती दररोज सकाळी आणि संध्याकाळी काम करत असे. दरम्यान, तिची एका व्यक्तीसोबत ओळख झाली. त्यांची मैत्री घट्ट होऊ लागली. मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. दोघेही एकमेकांच्या खूप प्रेमात होते.
दरम्यान, सुलोचना आणि तिचा प्रियकर हे वेगवेगळ्या ठिकाणी राहात असत. मात्र, त्यांचे जेवण सोबतच होत असे. सुलोचना यांनी स्वयंपाक केला आणि त्या जेवणासाठी प्रियकराची वाट पाहू लागल्या. खूप वेळ वाट पाहूनही तो जेवणासाठी आलाच नाही. त्यामुळे संतापलेल्या सुलोचना यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पुढील तपास सुरु केला आहे.