
भारतातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platforms) कंपनी असलेल्या ShareChat ने पुन्हा एकदा अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. यापूर्वी, 5 टक्के कर्मचार्यांना त्याचे फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्म बंद करून कामावरून काढून टाकण्यात आले होते. यावेळी सुमारे 600 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जे कर्मचारी अकार्यक्षम आणि बिनकामाचे आहेत, अशा कर्मचाऱ्यांचा कामावरून काढण्यातां आलं आहे. भविष्यात आणखी कठोर निर्णय घेतले जाणार आहे, असंही कंपनीच्या सीईओकडून सांगण्यातं आलं आहे.
शेअरचॅटचा असा विश्वास आहे की बाजाराकडे पाहता या वर्षी गुंतवणूक करताना खूप सावध राहावे लागेल. कंपनी लाइव्ह स्ट्रीमिंग आणि जाहिरातींच्या माध्यमातून कमाई दुप्पट करण्याचा प्रयत्न करेल. त्याच वेळी, काढून टाकलेल्या कर्मचार्यांना त्यांच्या नोटिस कालावधीचा पूर्ण पगार, कंपनीशी संबंधित प्रत्येक वर्षासाठी दोन आठवड्यांचा पगार आणि डिसेंबर 2022 पर्यंत बदलत्या वेतनाचे 100% पेमेंट मिळेल. याशिवाय उर्वरित सुट्ट्यांच्या बदल्यात 45 दिवसांपर्यंतचे पेमेंटही दिले जाईल.
शेअरचॅट हे भारतातील सर्वात लोकप्रिय घरगुती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. भारतात शेअरचॅट वापरकर्त्यांची संख्या 400 दशलक्ष आहे. 2015 मध्ये अंकुश सचदेवा, भानू प्रताप सिंह आणि फरीद अहसान यांनी मिळून हा मंच सुरू केला. शेअरचॅट व्यतिरिक्त, कंपनी Moj प्लॅटफॉर्म देखील चालवते, जे वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.