पाहा व्हिडीओ: शार्दुल ठाकुरने गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत केला साखरपुडा!

WhatsApp Group

मुंबई – भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने त्याची गर्लफ्रेंड मिताली पारुलकरसोबत साखरपुडा केला आहे. सोबत राहिल्यानंतर आता दोघांनी एकत्र होण्याचा निर्णय घेतला आहे . सोमवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रांगणात शार्दुल आणि मितालीचा साखरपुडा पार पडला. या सोहळ्याला भारतीय टी20 संघाचा कर्णधार रोहित शर्माहीने आपली हजेरी लावली होती.

या साखरपुडा समारंभात रोहित शर्मासह सुमारे 75 लोकांना आमंत्रित केले होते, ज्यात कुटुंबातील सदस्य आणि मित्र उपस्थित होते. साखरपुड्यानंतर जवळपास एक वर्षानंतर शार्दुल ठाकूर आणि मिताली पारोळकर लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकानंतर दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकू शकतात.


शार्दुलने भारतासाठी आतापर्यंत चार कसोटी, 15 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान शार्दुलने कसोटीत 14, एकदिवसीय सामन्यात 22 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 31 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, ठाकूरने आयपीएलमध्ये 61 सामने खेळले आहेत आणि 27.86 च्या सरासरीने आणि 18.81 च्या स्ट्राइक रेटने 67 बळी घेतले आहेत.


तीस वर्षांचा शार्दुल शेवटचा T20 विश्वचषक 2021 मध्ये भारताकडून खेळताना दिसला होता. त्या स्पर्धेत त्याला दोन सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. सध्या चालू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी शार्दुललाा विश्रांती देण्यात आली आहे.