महाविकास आघाडी वाचवण्यासाठी शरद पवार उतरले मैदानात,थेट शिंदेनाच ‘आऊट’ करण्याचा प्लॅन

WhatsApp Group

मुंबई – महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी या सरकारचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांनी कंबर कसली आहे. विधानसभेच्या उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना शरद पवारांनी खास सूचना केल्या आहेत. त्यानुसार थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आऊट करण्याचा पवारांचा प्लॅन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेनेतील शिंदे समर्थक आमदार हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. पण, त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईमध्ये विधानसभेमध्ये यावे लागेल. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना रोखण्याचा प्लॅन शरद पवारांनी बनवल्याचं समजतंय.

विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांच सभासदत्व रद्द झाल्यावर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी संख्याबळाचं गणित बदलणार आहे. या बदललेल्या गणिताचा फायदा महाविकास आघाडी सरकारला करून देण्याची शरद पवारांची योजना आहे. एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झाले तर राजकीय चित्र बदलू शकतं, त्यामुळे त्यावर देखील आता महाविकास आघाडी सरकार लक्ष केंद्रीत करणार आहे.