महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे. कारण कुठं थांबायचं हे मला माहिती आहे. त्यासाठी मी जयंत पाटील व प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच बैठक बोलवणार असल्याचंही शरद पवार म्हणाले.
“I am resigning from the post of the national president of NCP,” says NCP chief Sharad Pawar pic.twitter.com/h6mPIk4wgJ
— ANI (@ANI) May 2, 2023
राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असंही ते म्हणालेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा रंगली आहे.
शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृत जमलेल्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच निर्णय मागे घेईपर्यंत सभागृह सोडणार नाही, असा आग्रह कार्यकर्त्यांचा धरला.