
राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. एकीकडे शिवसेनेच्या पक्षचिन्हावरुन शिंदे-ठाकरे गटात बैठकांवर बैठका सुरु असताना एका घटनेमुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एकाच गाडीमधून प्रवास केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
शरद पवार आणि रावसाहेब दानवे एकाच गाडीतून गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये ज्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार थांबले आहेत, त्याच हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सुध्दा काही वेळीपूर्वी दाखल झाले होते. त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला.